सोहेल मेहमूद पाकचे नवे परराष्ट्र सचिव
   दिनांक :31-Mar-2019
इस्लामाबाद:
 पाकिस्तानचे भारतातील उच्चायुक्त सोहेल मेहमूद यांची पाकिस्तानने देशाचे नवे परराष्ट्र व्यवहार सचिव म्हणून नियुक्ती केली आहे. परराष्ट्र मंत्री शहा मेहमूद कुरेशी यांनी ही माहिती दिली.
 
 

 
मुल्तान येथे पत्रकारांशी बोलताना कुरेशी म्हणाले की, पंतप्रधान इम्रान खान यांच्यासोबत चर्चा करण्यात आल्यानंतर सोहेल मेहमूद यांना या पदावर नियुक्त करण्याचा निर्णय शनिवारी घेण्यात आला. विद्यमान परराष्ट्र व्यवहार सचिव तेहमिना जांजुआ येत्या १६ एप्रिल रोजी सेवेतून निवृत्त होत असल्याने त्यांच्या जागी सोहेल यांची निवड करण्यात आली. ऑगस्ट २०१७ मध्ये सोहेल यांची उच्चायुक्त पदावर नियुक्ती करण्यात आली होती.
 
त्यांच्या नियुक्तीनंतर मी लगेच सोहेल यांना फोन केला आणि याबाबतची माहिती देऊन, त्यांचे अभिनंदनही केले. पुलवामा येथील घटना दहशतवादी हल्ला नसून, तो केवळ एक अपघात होता. या घटनेनंतर सोहेल इस्लामाबादला आले होते आणि दोन्ही देशांमधील स्थितीवर चर्चा झाली होती, असे कुरेशी यांनी सांगितले.