'ही' गर्भश्रीमंत अभिनेत्री म्हणतेय ‘कुणी घर देता का घर’
   दिनांक :31-Mar-2019
 
अचानक मिळालेले यश प्रत्येकाला पचविता येतेच असे नाही. असाच एक प्रकार सध्या हॉलिवूडची अभिनेत्री केंडले जेनरच्या बाबतीत घडला आहे. भूतकाळात अनेकांचे केलेले अपमान, पैशांचा दाखवलेला माज आणि उद्धटपणा यामुळे तिच्या नशिबाची चक्रे एकाएकी उलटी फिरू लागली. परिणामी अन्न, वस्त्र व महागडय़ा सौंदर्य प्रसाधनांची गरज भागवण्यासाठी मारामारी सुरू असतानाच आता तिच्या डोक्यावरील निवाराही गेला आहे. गेली दोन वर्ष केंडल प्रियकर बेन सिमन्सबरोबर राहात होती. परंतु अंतर्गत मतभेदांमुळे सुरळीत सुरू असलेला संसार तिने एकाएकी मोडला. आणि तिथूनच तिच्या उतरत्या प्रवासाची सुरुवात झाली. 
 

 
 
 
बोल्ड छायाचित्रे व वादग्रस्त विधानांच्या जोरावर केंडलने मोठा चाहता वर्ग गोळा केला होता. परिणामी तथाकथित लोकप्रियतेच्या जोरावर सर्वात प्रथम तिला ‘अमेरिकन चिअरलीडर’ नियतकालिकाच्या कव्हर पेजवर झळकण्याची संधी मिळाली. त्यानंतर सामान्य जीवन व्यतीत करणाऱ्या केंडलचे आयुष्य एकाएकी बदलले. तिची ‘अमेरिकन चिअरलीडर’मधील छायाचित्रे इतकी गाजली की सुपरस्टार जस्टिन बीबरदेखील तिच्या प्रेमात पडला. त्यानंतर तिने अनेक मोठय़ा ब्रँडच्या जाहिराती केल्या. सौंदर्याला अभिनयाचा शाप असतो असे आल्फ्रेड हिचकॉकने म्हटले होते. केंडल जेनर या वाक्यात जशीच्या तशी बसते. सध्या तिची आर्थिक परिस्थिती इतकी वाईट आहे की, घरभाडे भरण्यासाठी सुद्धा तिच्याकडे वेळ नाही. त्यामुळे तिच्यावर  अक्षरश: ‘कुणी घर देता का घर’ म्हणायची वेळ आली आहे.