सोनालीची आई जावईबापूंच्या शोधात !
   दिनांक :31-Mar-2019
 
 

 
 
 
मराठी सिनेसृष्टीतली अप्सरा म्हणजेच सोनाली कुलकर्णीची आईने  लग्न करण्यासाठी सध्या तिच्या मागे तगादा लावला आहे. काही महिन्यापूर्वी सोशल मीडियावरील सोनालीचे काही फोटो पाहून रसिकांमध्ये वेगळीच कुजबू सुरु झाली होती. नववधूप्रमाणे नटलेल्या आणि साजश्रृंगार केलेल्या सोनालीचा लूक पाहून तिने लग्न केले असल्याचे वाटले होते. सध्या सगळीकडे लग्नाचा मौसम सुरु आहे. सर्वसामान्यांसह सेलिब्रिटीमंडळीसुद्धा रेशीमगाठीत अडकत आहेत. गेल्या काही महिन्यांत अनेक कलाकार मंडळी आपल्या लाडक्या जोडीदारासह लग्नाच्या बेडीत अडकले आहेत. त्यामुळे सोनाली कुलकर्णीनेही लवकरात लवकर लग्नाच्या बेडीत अडकावे अशी तिच्या आईची इच्छा आहे. सोनालीने आपल्या पसंतीचा जोडीदार निवडत दोनाचे चार हात करावे असे तिच्या आईनेही सांगितले आहे.