जामठ्यावर धोनीचं आहे 'रन मशीन '
   दिनांक :04-Mar-2019
नागपूर,
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा वन-डे सामना उद्या नागपूरातील विदर्भ क्रिकेट संघटनेच्या जामठ्यातील मैदानावर होणार आहे. हे मैदान भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीसाठी खूप भाग्यशाली ठरले आहे. कारण या मैदानात सर्वाधिक धावा धोनीच्याच नावावर आहे. तसेच, या मैदानात धोनीची धावा काढण्याची सरासरी तब्बल १३४ एवढी आहे.
 
 
 
धोनीने जामठ्यावर आतापर्यंत पाच सामने खेळले आहेत. या पाच पैकी चार सामन्यांमध्ये धोनीला फलंदाजी करण्याची संधी मिळाली आहे. या चार डावांमध्ये धोनीने दोन वेळा नाबाद राहून २६८ धावा बनवल्या आहेत. या चार सामन्यांमध्ये त्याची सरासरी १३४ एवढी आहे आणि यामध्ये दोन शतकांचाही समावेश आहे. धोनीनंतर या मैदानात सर्वाधिक धावांच्या यादीमध्ये कोहली दुसऱ्या स्थानावर आहे. कोहली नावे २०९ धावा आहेत.
वीसीएमध्ये वनडेत सर्वाधिक रन बनवणारे फलंदाज :
महेंद्रसिंग धोनी (२ शतक) - २६८ रन

विराट कोहली (१ शतक, १ अर्धशतक)- २०९ रन

रोहित शर्मा (१ शतक, १ अर्धशतक)- २०४ रन

शेन वॉटसन (१ शतक, १ अर्धशतक)- १८३ रन

सचिन तेंडुलकर (१ शतक) - १५८ रन
गेल्या वर्षी धोनी विश्वचषकात खेळणार की नाही, यावर जोरदार चर्चा सुरु होती. पण या चर्चेला धोनीनेच आपल्या कामगिरीच्या जोरावर पूर्णविराम दिला आहे. या वर्षी धोनीने ६ डावांमध्ये १५०.५०च्या सरासरीने ३०१ धावा चोपल्या आहेत. यामध्ये चार अर्धशतकांचा समावेश असून तो चारवेळा नाबाद ठरला आहे. यावर्षी सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत धोनी आठव्या स्थानावर आहे, तर सरासरीच्या बाबतीत तो दुसऱ्या स्थानावर आहे.