अभिनंदन यांचे पुन्हा कॉकपीटमध्ये जाणे फिटनेसवर अंवलबून – बी.एस.धनोआ
   दिनांक :04-Mar-2019
 विंग कमांडर अभिनंदन वर्थमान यांचे फायटर वैमानिक म्हणून पुन्हा रुजू होणे त्यांच्या वैद्यकीय फिटनेसवर अवलंबून आहे असे हवाई दल प्रमुख बीरेंद्र सिंग धनोआ यांनी सोमवारी सांगितले. विंग कमांडर अभिनंदन यांची शुक्रवारीच पाकिस्तानच्या ताब्यातून सुटका झाली. भारताच्या हवाई हद्दीत घुसलेल्या पाकिस्तानच्या एफ-१६ फायटर जेट विमानांना पिटाळून लावताना झालेल्या हवाई संघर्षात अभिनंदन यांचे मिग-२१ बायसन विमान पाकव्याप्त काश्मीरमध्ये कोसळले. हवेतल्या या लढाईत त्यांनी पाकिस्तानचे एक एफ-१६ विमानही पाडले.
 
 
अभिनंदन फायटर विमान पुन्हा कधी उडवणार असा प्रश्न धनोआ यांना हा प्रश्न विचारले असता त्यावर धनोआ यांनी ते विमान उड्डाण करु शकतात की, नाही ते त्यांच्या फिटनेसवर अवलंबून आहे असे सांगितले. त्यांना ज्या उपचारांची त्यांना गरज लागेल ती ट्रीटमेंट आम्ही देत आहोत. ते वैद्यकीय दृष्टया फिट झाल्यानंतर पुन्हा कॉकपीटमध्ये जाऊ शकतात असे धनोआ म्हणाले.