किती अतिरेकी मारले हे मोजणे आमचे काम नाही- हवाई दल प्रमुख
   दिनांक :04-Mar-2019
आम्ही लक्ष्य ठरवल्यानंतर त्यावरच प्रहार करतो. पाकिस्तानातील बालकोटमध्ये आम्ही लक्ष्यावर अचूक प्रहार केला. आम्ही जंगलामध्ये बॉम्ब टाकले मग पाकिस्तानी पंतप्रधानांनी प्रत्युत्तर का दिले ? असा सवाल हवाई दल प्रमुख बीरेंद्र सिंग धनोआ यांनी विचारला.

 
बॉम्ब टाकल्यानंतर किती जण ठार झाले ते मोजण्याचे काम हवाई दल करत नाही. ते सरकारचे काम आहे असे धनोआ यांनी सांगितले.