आजचे राशी भविष्य, दि. ४ मार्च २०१९
   दिनांक :04-Mar-2019
 
मेष : आणखी आशावादी राहण्यासाठी स्वत:ला प्रवृत्त करा. त्यामुळे तुमचा आत्मविश्वास आणि परिवर्तनशीलता, लवचिकता वाढेल. कुटुंबातील सदस्यांच्या आनंदी स्वभावामुळे घरातील वातावरण प्रसन्न राहील. 
 
वृषभ : तुमच्या सर्व अडचणी, समस्यांवर हसत हसत मात करणे हाच उत्तम उपाय ठरतो. तुम्ही जर अधिक धनप्राप्तीची अपेक्षा करत असाल तर सुरक्षित अशाच आर्थिक योजनांमध्ये पैसे गुंतवा. संततीच्या योजना करण्यासाठी उत्तम दिवस आहे. तुमचा/तुमची जोडीदार तुमच्यावर अखेरपर्यंत प्रेम करत राहील, हे आज तुम्हाला कळेल. 
 
मिथुन :  ज्येष्ठांनी त्यांच्या जास्तीच्या ऊर्जेचा वापर सकारात्मक गोष्टींसाठी करून त्याचा चांगला लाभ घ्यावा. ज्यांची किंमत वाढतच जाणार आहे अशा वस्तूंच्या खरेदीसाठी आजचा दिवस शुभ आहे. वैवाहिक आयुष्याकडून आवस्तव अपेक्षा ठेवल्या तर केवळ दु:खी होण्याची शक्यता आहे.
 
कर्क : तुमच्या विचारांवर ज्यांचा असाधारण प्रभाव आहे अशा विशेष व्यक्तीची ओळख मित्रामुळे होऊ शकते. अवास्तव खर्च करण्याकडे तुमचा कल असेल.  तुम्ही एखाद्या सोहळ्याला गेलात तर नवीन मित्रमंडळी, नवीन व्यक्तींच्या ओळखी होतील आणि तुमचा मित्रपरिवार विस्तारेल.
 
सिंह : आजचा दिवस लाभदायक असून, तुम्हाला तुमच्या दीर्घ आजारापासून सुटका मिळण्याची शक्यता आहे. कोणतीही गुंतवणूक घाईगडबडीत करू नका. आज तुमच्याजवळील उत्तम संकल्पना आणि तुम्ही केलेल्या कृती यामुळे तुमच्या अपेक्षेच्या बाहेर तुम्हाला फायदा होईल. 
 
कन्या : सहकुटूंब सामाजिक कार्य केल्याने प्रत्येकजण आनंद आणि निवांत राहील. आज लोक तुमचे अभिनंदन करतील - याच अभिनंदनाची, कौतुकाची थाप मिळण्याची तुम्ही आतुरतेने वाट पाहत होतात. भावनांवर नियंत्रण ठेवणे कठीण होऊन बसेल - तुमचे अनपेक्षित वागणे तुमच्या अवतीभवतीच्या लोकांना गोंधळात टाकेल. 
 
तूळ :  स्थावर जंगम मालमत्ता गुंतवणूक लाभदायी ठरेल. तुमची प्रिय व्यक्ती तुमच्याकडून आज वचन मागेल - जे वचन तुम्ही पूर्ण करू शकणार नाही ते देऊ नका. महत्त्वाच्या व्यक्तींशी चर्चा करताना शब्द अतिशय काळजीपूर्वक वापरा. तुमच्या कामाला आज दाद मिळेल.
 
वृश्चिक :  संध्याकाळपर्यंत खुशखबर अचानक मिळाल्याने तुमच्या कुटूंबात आनंदाचे वातावरण तयार होईल. तुमच्या उपस्थितीमुळे तुमच्या प्रिय व्यक्तीचे विश्व स्वर्ग बनेल. सामाजिक तसेच धार्मिक कार्यक्रमांसाठी उत्तम दिवस आहे. गोपनीयता बाळगा. 
 
धनु : पी हळद आणि हो गोरी असे होत नाही. आज केलेल्या प्रयत्नांचा ताबडतोब निकाल मिळणार नाहीत परंतु त्यामुळे भविष्यातील नफा मिळण्यासाठी चांगला पाया तयार होईल. संयुक्त प्रकल्पात आणि संशयास्पद आर्थिक योजनांमध्ये गुंतवणूक करू नका. नातेसंबंध नव्याने दृढ करण्याचा दिवस.
 
मकर : मित्रांच्या योगाने महत्त्वाच्या व्यक्तींशी संपर्क बनतील. तुम्हाला शांत ठेवणा-या उपक्रमांमध्ये स्वत:ला गुंतवा. दीर्घकाळ प्रलंबित असणारी थकबाकी आज वसूल होण्याची शक्यता आहे. 
 
कुंभ : वाहन चालवतांना सावधगिरी बाळगा. नको त्या भानगडीत पडू नका. आपल्या कामाशी काम ठेवा. वेळेचे नियोजन करणे आवश्यक आहे. 
 
मीन : अनेक दिवसांपासून मनांत असलेल्या योजना प्रत्यक्षात आणण्यासाठी आजचा दिवस अत्यंत योग्य असा आहे. नवीन वस्तू खरेदी कराल. स्थावराचे व्यवहार करताना दक्षता घ्या. परदेशांतून योग्य तो संदेश आज नक्की येणार. निळा- आकाशी रंग आज लाथदायी आहे.