नोबेल पुरस्कारासाठी मी पात्र नाही- इम्रान खान
   दिनांक :04-Mar-2019
पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना शांततेचा नोबेल पुरस्कार द्यावा, या मागणीने पाकिस्तानात जोर धरला असतानाच, मी नोबेल पुरस्कारासाठी पात्र नाही, काश्मीरचा मुद्दा सोडवणाऱ्या व्यक्तीला हा पुरस्कार देण्यात यावा, असे खुद्द इम्रान खानने ट्विट केले आहे. 

 
 
भारतीय हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन यांना मायदेशात पाठवल्यानंतर इम्रान खान यांना नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात यावे, अशी मागणी पाकिस्तानात जोर धरू लागली आहे. त्यावर इम्रान यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. यासंबंधी त्यांनी सोमवारी ट्विट केले आहे. नोबेल पुरस्कारासाठी मी पात्र नाही. काश्मिरी जनतेच्या इच्छेनुसार काश्मीर मुद्दा सोडवणाऱ्या व्यक्तीला नोबेल पुरस्कार द्यायला हवा. या मुद्द्यावर तोडगा निघाल्यास या क्षेत्रात शांतता नांदेल आणि विकास होईल, असे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.