भारतीय लष्कराच्या आवडत्या गाडीची निर्मिती बंद
   दिनांक :04-Mar-2019

मारुती सुझुकी कंपनीने आपल्या ‘जिप्सी’चं उत्पादन अधिकृतपणे बंद केलं आहे. Rushlane च्या एका अहवालानुसार कंपनीने आपल्या डिलर्सना इ-मेलद्वारे याबाबत माहिती दिली आहे. ‘कंपनीने जिप्सीच्या सर्व व्हेरिअंट्सचं उत्पादन तातडीने बंद केलं आहे, त्यामुळे डिलर्सनी ग्राहकांकडून या गाडीसाठी बुकिंग घेऊ नये’, असा संदेश या इ-मेलमध्ये आहे.

 
 

 
 

1985 मध्ये कंपनीने जिप्सी (डिझेल एसयुव्ही) लाँच केली होती आणि सुरूवातीच्या काही वर्षांमध्ये ग्राहकांकडून या गाडीला चांगला प्रतिसाद मिळाला होता. त्यानंतर भारतीय सैन्याच्या सेवेत ही गाडी आली. लष्कराकडून 1991 साली मारुती कंपनीला जिप्सीची पहिली ऑर्डर देण्यात आली होती. त्यानंतर आतापर्यंत लष्कराला कंपनीने 35 हजाराहून जास्त जिप्सी पुरवल्या आहेत. गेल्या वर्षी लष्कराकडून कंपनीला 4 हजार युनिट्सची सर्वाधिक ऑर्डर मिळाली होती. 500 किलो वजन वाहून नेण्याची क्षमता आणि शहरी, डोंगरी किंवा वाळवंटाच्या रस्त्यांवरही सहजगतीने धावण्याच्या वैशिष्ट्यामुळे ही गाडी लष्कराची आवडीची गाडी होती. लष्करी साहित्य नेण्यासाठी या गाडीच्या मागील बाजूला हूक देखील होते.