एयर स्ट्राईकवेळी ३०० मोबाईल होते ऍक्टिव्ह
   दिनांक :04-Mar-2019
नवी दिल्ली:
 भारतीय हवाई दलाने नियंत्रण रेषा ओलांडून जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवादी तळांवर हल्ले केले, त्यावेळी त्या भागात 300 मोबाईल ऍक्टिव्ह होते, अशी आकडेवारी समोर आली आहे. विशेष म्हणजे हे फोन ऍक्टिव्ह असल्याची माहिती भारतीय गुप्तचर विभागाच्या तांत्रिक विभागाला मिळाली. एअर स्ट्राइकमध्ये नेमके किती दहशतवादी मारले गेले, याची चर्चा सुरू असताना ही आकडेवारी पुढे आली आहे. एअर स्ट्राइकच्यावेळी जवळपास 300 मोबाईल ऍक्टिव्ह असल्याने  तिथे किती दहशतवादी असतील, याचा अंदाज लावता येऊ शकतो, अशी माहिती सूत्रांनी दिली.

 
पाकिस्तानच्या खैबर पख्तुनख्वा प्रांतातील दहशतवादी तळांवर हल्ला करण्याची परवानगी भारतीय हवाई दलाला मिळाली. यानंतर हवाई दलाने लक्ष्यभेद करण्याआधी राष्ट्रीय तांत्रिक संशोधन संस्थेने (एनटीआरओ) तळांवर देखरेख ठेवण्यास सुरुवात केली, अशी माहिती सूत्रांनी दिली.