दुसऱ्या वन-डे आधी भारतीय संघाचा कसून सराव
   दिनांक :04-Mar-2019
नागपूर, 
विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या जामठा येथील मैदानावर उद्या मंगळवारी भारत व ऑस्ट्रेलिया संघादरम्यान दुसरा वन-डे सामना खेळला जाणार आहे. ५ सामन्यांच्या या मालिकेत भारतीय संघाने पहिला सामना जिंकून मालिकेत आघाडी घेतली आहे. तरीही ऑस्ट्रेलियाला पुनरागमन करण्याची कोणतीही संधी मिळू नये, याकरीता भारताचे खेळाडू जीवतोड मेहनत घेत आहेत.
 
 
पहिल्या सामान्यापूर्वी आज भारताच्या खेळाडूंनी पहिल्या सत्रात कसून सराव केला. एम.एस धोनी, केदार जाधव, विराट कोहली यांच्यासह सर्वांनीच फलंदाजीचा सराव केला तर भारताच्या गोलंदाजांनी देखील घाम गाळल्याचे पाहायला मिळाले.
 
 
पहिल्या दोन वन-डे सामन्यांसाठी भारतीय संघ -
विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, शिखर धवन, अंबाती रायुडू, केदार जाधव, एमएस धोनी, जसप्रीत बुमराह, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, विजय शंकर, केएल राहुल, ऋषभ पंत, सिद्धार्थ कौल आणि रविंद्र जडेजा.