लोकसभा लढवण्यास प्रिया दत्त तयार !
   दिनांक :04-Mar-2019
मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपाला काट्याची टक्कर देण्यासाठी काँग्रेस आपल्या जुन्या उमेदवारांना निवडणूक रिंगणात उतरविण्यासाठी सध्या त्यांची मनधरणी करीत आहे.  मिलिंद देवरांपाठोपाठ काँग्रेसच्या माजी खासदार प्रिया दत्त यांना सुद्धा काँग्रेस लोकसभा लढविण्यासाठी राजी केल्याचे वृत्त आहे. 
 

 
 
उत्तर मध्य मुंबई मतदारसंघातून प्रिया दत्त निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची चर्चा आहे. प्रिया दत्त या दिवंगत अभिनेते आणि काँग्रेस नेते सुनिल दत्त यांची कन्या असून  सुनिल दत्त यांच्या मृत्यूनंतर २००९ मध्ये प्रिया दत्त यांनी उत्तर मध्य मुंबईच्याच जागेवरुन खासदारकी मिळवली होती. २०१४ मधील लोकसभा निवडणुकीत मात्र भाजपच्या पूनम महाजनांकडून पराभूत व्हावे लागले होते. अश्यात निवडणुकीच्या रिंगणात त्यांचा टिकाव लागेल का ? हे काळच ठरवेल.