सुजय विखे-पाटील भाजपाच्या मार्गावर?
   दिनांक :04-Mar-2019
 
नाशिक: काँग्रेसचे नेते आणि विधानसभेचे विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र सुजय विखे पाटील हे भाजपात प्रवेश करणार असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात आहे. याचे कारण म्हणजे काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीतला नगरच्या जागेचा तिढा न सुटल्यास सुजय हे भाजपात प्रवेश करणार असल्याचे बोलल्या जात आहे. राधाकृष्ण विखे पाटील यांनी माध्यमांशी बोलतांना केलेल्या वक्तव्यामुळे या चर्चेला बळ मिळाले आहे. अहमदनगरच्या जागेसाठी राष्ट्रवादीचा दावा नवीन नाही. मात्र तीन वेळा राष्ट्रवादी नगरमध्ये पराभूत झाल्यामुळे ती जागा मिळावी, यासाठी आम्ही आग्रही असल्याचं विखे-पाटील म्हणाले. चर्चेतून विषय सोडवावा, हा प्रतिष्ठेचा मुद्दा करुन फायदा नाही, असेही ते म्हणाले. याशिवाय सुजय यांना राजकीय निर्णय घेण्याचे पूर्ण स्वतंत्र असल्याचेही ते म्हणाले. विखे पाटलांचे हे वक्तव्य म्हणजे एका प्रकारे सुजय यांच्या पक्षांतराचे संकेत मानल्या जात आहे.