अज्ञात रोगाने पाच जनावरांचा मृत्यू
   दिनांक :05-Mar-2019

-रोगाचे कारण अद्यापही अष्पस्ट

कारंजा,
तालुक्यातील जऊरवाडा येथे अज्ञात रोगामुळे पाच जनावरे दगावली आहे. एका आठवड्यापासून अज्ञात रोगाची लागण जनावरांना झाली आहे यात काही जनावरांचा धर्ती पशुसंवर्धन दवाखान्यात उपचार सुरू आहे, तर पाच जनावरे मृत्युमुखी पडली आहे, त्यामुळे जऊरवाडा येथील पशुपालकांचे जवळपास एक लाख रुपयाचे नुसकान झाले आहे.
 
या जनावरांवर तीन-चार दिवसापासून उपचार सुरू होता काल दोन त्याच्या आधी तीन अशी पाच जनावरांचा मृत्यू झाला आहे याबाबत पाचही जनावरणाचा पशुधन पर्यवेक्षक धर्ती ,सविता मुंदाने , परिचर मुंने, गंधारे , पशुसंवर्धन अधिकारी जोगेकर यांनी शवविच्छेदन केले.
 
अचानक दोन-तीन दिवसात जनावरे दगावली त्यांच्या लक्षणानुसार पशुसंवर्धन विभाग पंचयात समिती कारंजा च्या वतीने चमुला पाचारण करण्यात येऊन चार ते पाच दिवसापासून औषध उपचार सुरू आहे. मृत गायीचे शवविच्छेदन करण्यात आले असून नमुने प्रयोगशाळेला पाठवन्यात येत आहे प्रयोगशाळे चा अवहाल आल्यानंतर योग्य ते निदान समजेल अशी माहिती तालुका पशुसंवर्धन अधिकारी जोगेकर यांनी दिली आहे