हम दिल दे चुके सनम -२
   दिनांक :05-Mar-2019
 
सलमान खान आणि ऐश्वर्या रॉय यांचा 'हम दिल दे चुके सनम' बॉक्स ऑफिसवर मोठ्या प्रमाणात सुपरहिट ठरल्यानंतर आता संजय लीला भन्साळी पुन्हा सलमान खानला घेऊन 'हम दिल दे चुके सनम-२' पुन्हा घेऊन येणार अशी चर्चा आहे. भन्साळींनी याची कथा सलमानला ऐकविल्याचेही सांगण्यात येते. 
 

 
 
सलमानलादेखील ती आवडल्याने त्यानं होकार कळवलाय. या नव्या चित्रपटाचे नाव जरी 'हम दिल दे चुके सनम २' ठेवण्यात येणार असले तरी हा चित्रपटाचा सिक्वेल नसेल. 'हम दिल दे चुके सनम'सारखीच ही एक लव्ह स्टोरी असल्याने असं नाव ठेवण्यात येणार असल्याची चर्चा आहे.