निवडणुकीशी एअर स्ट्राईकचा संबंध नाही- निर्मला सीतारामन
   दिनांक :05-Mar-2019
 
नवी दिल्ली :  दहशतवाद्यांनी पुलवामा येथे सीआरपीएफच्या जवानांवर झालेल्या हल्लानंतर गुप्तचर खात्यांना पाकिस्तानात दहशतवाद्यांची तळ असल्याची माहिती मिळाली होती. या दहशतवाद्यांचा वापर भारताविरोधी कारवाईसाठी केला जाणार होता. त्यामुळेच भारताने हवाई हल्ला करत या दहशतवाद्यांची तळ उदध्वस्त केली. या एअर स्ट्राईकचा निवडणुकीशी कुठलाही संबंध नसल्याचे संरक्षण मंत्री निर्मला सीतारमन यांनी स्पष्ट केले. या एअर स्ट्राईक नंतर विरोधकांनी याचा संबंध निवडणुकीशी जोडण्याचा प्रयत्न केला. इतकेच काय तर विरोधी पक्षाकडून याचे पुरावे सुद्धा मागण्यात आले. विरोधकांच्या या वक्तव्यावर निर्मला सीतारमन यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.