एवढीच इच्छा असेल तर काँग्रेसने जाऊन मृतदेह मोजावे
   दिनांक :05-Mar-2019
राजनाथ सिंह यांनी टोचले काँग्रेसचे कान !
 
धुबरी (आसाम ),
'एअर स्ट्राईक'मध्ये मारल्या गेलेल्या दहशदवाद्यांच्या आकड्याचा पुरावा मागणाऱ्या काँग्रेसचे गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी चांगलेच कान टोचले आहे. काँग्रेसची इच्छा असेल तर त्यांनी खुशाल पाकिस्तानात जावे आणि मृतदेह मोजून यावे असा खोचक सल्ला त्यांनी काँग्रेसला दिला आहे.  आसामच्या धुबरी येथे एका सभेत त्यांनी काँग्रेसला खडेबोल सुनावले. 
 

 
 
कपिल सिब्बल यांनी सोमवारीच आम्हाला दहशतवाद्यांचे मृतदेह बघायचे आहेत असं म्हणत एअर स्ट्राईकचे पुरावे मागितले. तसेच इतर काँग्रेस नेत्यांनीही या स्ट्राईकवर संशय व्यक्त केला. ३०० दहशतवादी ठार झाले हा दावा भाजपाकडून कोणत्या आधारावर केला जातो आहे? असाही प्रश्न काँग्रेसकडून उपस्थित करण्यात आला. याच सगळ्या गोष्टींना उत्तर देताना राजनाथ सिंह यांनी काँग्रेस नेत्यांना पाकिस्तानात जा आणि मृतदेह मोजून या असा सल्ला दिला आहे.