मनसेचा एकमेव आमदारही करणार शिवसेनेत प्रवेश ?
   दिनांक :05-Mar-2019
शरद सोनवणे यांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट
 
पुणे : ऐन निवडणुकीच्या तोंडावर मनसेचे इंजिन फेल पडण्याची चिन्ह सध्याच्या घडामोडीवरून दिसत आहे. मनसेचे एकमेव आमदार असलेले शरद सोनवणे यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसह मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतली. सूत्रांच्या मते ते काँग्रेसच्या वाटेवर आहेत. गेल्या काही काळात अनेक नेत्यांनी मनसे सोडण्याचा निर्णय घेतला. अश्यातच जुन्नर विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आणि मनसेचे एकमेव आमदारअसलेले शरद सोनवणे हेदेखील शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात आहे. दरम्यान, आता निवडणुकीच्या तोंडावर विविध पक्षातील नेते दुसऱ्या पक्षात उड्या मारण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वीच अभिनेते आणि शिवसेना नेते अमोल कोल्हे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. तर चंद्रपुरातील शिवसेना आमदारही काँग्रेसच्या संपर्कात असल्याचे सांगितल्या जात आहे.