म्हणून शिवसेना मागणार मोदींच्या नावाने मत
   दिनांक :05-Mar-2019
 मुंबई :  सत्तेत असूनही शिवसेनेना पंतप्रधान मोदी यांच्यावर सातत्याने टीका करीत आली आहे. मात्र, असे असतानाही राष्ट्रीय सुरक्षा आणि विकासाच्या मुद्यावर शिवसेनेने युती केली आहे. त्याामुळे मोदींच्या नावाने मते मागायला शिवसेनेला कोणतीही अडचण नाही, अशी स्पष्टोक्ती शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांनी केली आहे. सायन येथे पादचाऱ्यांसाठी सरकते जिने लावण्यात येणार आहेत. त्याच्या भूमिपूजनाच्या निमित्ताने दक्षिण मुंबई, मुंबई मतदार संघात युतीच्या प्रचाराच्या नारळ फोडण्यात आला. यावेळी खासदार शेवाळे बोलत होते. या कार्यक्रमाला भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलारही उपस्थित होते.  या कार्यक्रमाच्या निमित्ताने युतीतला तणाव आता दूर झाला असून शिवसेना आणि भाजपचे नेते एका मंचावर यायला सुरुवात झाली आहे. या भूमिपूजन कार्यक्रमातही शेलार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्याचे आवाहन केले. शिवसेना सोबत आल्याने आता २०१४ च्या लोकसभेपेक्षा अधिक यश मिळवू अशी आशाही शेलार यांनी व्यक्त केली.