अयोध्या प्रकरणावर उद्या सुनावणी
   दिनांक :05-Mar-2019
 
नवी दिल्ली :  अयोध्या रामजन्मभूमी बाबरी मस्जिद विवादीत जागेच्या वादावर हे प्रकरण मध्यस्थी करण्यासाठी द्यावे की नाही यावर सुप्रीम कोर्ट उद्या म्हणजेच बुधवारी आपला निर्णय देणार आहे. या प्रकरणी सुप्रीम कोर्टाने मागच्या सुनावणीत  दोन्ही पक्षकारांना चर्चा करून या प्रकरणावर तोडगा काढण्याचा विचार करावा असा सल्ला दिला होता. 
 

 
 
बुधवारी सुप्रीम कोर्ट दोन्ही पक्षकारांना आपली मते मांडण्याची संधी देऊन हे प्रकरण मध्यस्थाकडे पाठवावे की नाही यावर निर्णय देईल. हिंदू पक्षकारांचे वकील या चर्चेसाठी विशेष उत्सुक नसल्याने या प्रकरणी मध्यस्ती केल्या जाण्याची शक्यता फार कमी आहे. मुस्लिम पक्षकारांचे वकील राजीव धवन यांनी सुप्रीम कोर्टाला सांगितले की मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो त्याचा आम्ही विरोध करणार नाही मात्र रामलल्लाचे वकील सीएस वैघनाथन यांनी याचा विरोध करत याआधीही मध्यस्थी करून अयोध्या प्रश्नी मार्ग काढण्याचा प्रयत्न केला गेला परंतु तो अयशस्वी झाला असल्याचे सांगितले. तसेच याबाबत अन्य हिंदु पक्षकारांचे वकील रंजीत कुमार यांनी विवादीत प्रकरणावर मध्यस्थी करण्याची भूमिकेची शक्यता नसून सुप्रीम कोर्टाने पुढे सुनावणी सुरु ठेवावी अशी मागणी केली होती.