दुचाकीच्या डिक्कीतून १ लाख लंपास
   दिनांक :06-Mar-2019
- वरवट बकाल येथील घटना
 
  
संग्रामपुर (बुलढाणा),
तालुक्यातील वरवट बकाल येथील बसस्थानक परिसरातून भरदिवसा दुचाकीच्या डीक्कीतून १ लाख रूपये लंपास झाल्याची घटना आज बुधवारी संध्याकाळच्या सुमारास घडली .
 
कळमखेड येथील शेतकरी अशोकराव महाले हे आज कापूस विकून ३ लाख रुपये बँकेत भरण्या करण्याकरीता आले. त्यांनी दोन लाख रुपये बँकेत भरणा केल्यानंतर उर्वरित १ लाख रुपये आपल्या दुचाकीच्या डिक्कीमध्ये ठेवले, वरवट बकाल येथील बस स्थानकावर रसवंती वर उसाचा रस पित असताना चोरट्याने डिक्कीवर हात साफ केला. दुकानाबाहेर आल्यानंतर शेतकऱ्याला चोरी झाल्याचे लक्षात आले, त्यांनी शोध घेण्याचा प्रयत्न केला मात्र रक्कम मिळाली नाही, त्यामुळे शेतकरी पुत्र अमोल अशोकराव महाले यांनी पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली पोलीसांनी वरवट बकाल बस स्थानक वर येऊन शहानिशा केली. पण तोवर चोरटा आपले काम साधून फरार झाला होता.
 
या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली असून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.  चोरट्यांनी दिवसा ढवळ्या आशा प्रकारे १ लाख रुपये लंपास करण्याची ही या परिसरातील पहिलीच घटना आहे नुकतेच रुजू झालेले तामगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार भूषण गावंडे यांच्या समोर या घटनेने आव्हान निर्माण केले आहे.