स्वच्छ सर्वेक्षणात अमरावती ७४ व्या स्थानी
   दिनांक :06-Mar-2019

- राज्यात २१ वा क्रमांक

 
 
अमरावती,
केंद्र शासनाकडून राबविण्यात येणार्‍या स्वच्छ सर्वेक्षण - २०१९ चे निकाल आज घोषित करण्यात आले.  त्यात अमरावती शहर देश पातळीवर ७४ व्या क्रमांकावर तर राज्यस्तरावर २१ वा क्रमांक प्राप्त झाला असल्याची माहिती मनपा आयुक्त संजय निपाणे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
 
स्वच्छ सर्वेक्षण २०१८ च्या तुलनेत यंदा अमरावती शहर अधिक स्वच्छ झाले आहे. स्वच्छ सर्वेक्षण २०१८ मध्ये अमरावती शहर देश पातळीवर १२२ व्या क्रमांकांवर होते तर राज्यस्तरावर ३४ व्या क्रमांकांवर होते. यंदाच्या सर्वेक्षणामध्ये देशातील संपुर्ण क्षारांचा सहभाग होता तर २०१८ मध्ये ४२०३ शहरे सहभागी झाली होती.
 
स्वच्छ सर्वेक्षण - २०१९ मध्ये ज्या अधिकारी आणि कर्मचारी यांनी सहभाग घेतला त्या सर्वांचे मनपा आयुक्तांनी अभिनंदन केले. तसेच स्वच्छ भारत अभियान अमरावती शहर समन्वयक डॉ. श्वेता बोके यांनी घेतलेल्या कठोर परिश्रमाबद्दल त्यांचे विशेष कौतुक केले. उपआयुक्त नरेंद्र वानखडे यांनी सदर विषयात महत्वपुर्ण योगदान दिले आहे. आरोग्य विभाग व स्वच्छता विभाग यामध्ये अधिकारी व कर्मचारी यांनी सदर सर्वेक्षणामध्ये उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल मनपा आयुक्त यांनी या सर्वांचे कौतुक केले. तसेच पुढील सर्वेक्षणामध्ये अमरावती शहर अधिक स्वच्छ व सुंदर बनवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी उपआयुक्त महेश देशमुख, नरेंद्र वानखडे, सहाय्यक आयुक्त योगेश पिठे, जनसंपर्क अधिकारी भुषण पुसतकर, स्वच्छ भारत अभियान अमरावती शहर समन्वयक डॉ. श्वेता बोके उपस्थित होते.