मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आयआयएम कॅम्पसचे भूमिपूजन
   दिनांक :06-Mar-2019
नागपूर,
आयआयएमच्या नागपूरातील नूतन कॅम्पसचे भूमिपूजन आज मिहान येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि अन्य नेते उपस्थित होते.
 
 
 
आयआयएम हा एक प्रमुख ब्रँड आहे. आयआयएमने आम्हाला अनेक जागतिक दर्जाचे व्यवस्थापन तज्ञ दिले आहेत. ही संस्था नागपूर व विदर्भामध्ये सुरू करता आली, यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मी आभार मानतो, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.
 
आपण जर विकासाचा प्रवास पाहिला तर तो शिक्षणाच्या वाटेवरूनच जातो. पुणे हे प्रथम शैक्षणिक हब बनले, नंतर औद्योगिक आणि नंतर केवळ आयटी हब बनले. नागपूर हे देशाचे झीरो माईल आहे. देशाचा ८०% जीडीपी नागपूरपासून अवघ्या एक तासाच्या हवाई अंतरावर आहे. नागपूर हे भविष्यातील लॉजिस्टिक हब बनणार आहे. आता ४०-५० वर्षाचा इतिहास असलेल्या आयआयएमशी नागपूर आयआयएमला स्पर्धा करावी लागेल. मला खात्री आहे की नागपूर आयआयएम यात आघाडीवर असेल आणि स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करेल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
 
 
 
ऑरेंज आकाराची ही इमारत राहणार असून १३२ एकर विस्तीर्ण जागेत कॅम्पस असणार आहे. पहिल्या टप्प्यात १४.९ एकर जागेवर १८ महिन्यात काम पूर्ण करण्यात येईल.