फेरारीने सोडली तंबाखू, सिगरेटची जाहिरात
   दिनांक :06-Mar-2019
मेलबर्न,
फॉर्म्युला वन टीम फेरारीने ऑस्ट्रेलियात होणार्‍या आगामी ग्रॅण्ड प्रिक्स मोसमासाठी आपल्या अधिकृत नावातून तंबाखू, सिगरेटच्या ब्रॅण्डिंगला वगळले आहे.
 
 
 
एफआयएने सिगारेट किंवा तंबाखूची जाहिरात किंवा प्रायोजकांचा प्रसार करण्यास विरोध केला आहे, परंतु फिलिप मॉरिस या कंपनीने वैज्ञानिक संशोधनाचा हवाला देत क्रीडा क्षेत्रात पुनरागमन केले आहे. मात्र फेरारीने फिलिप मॉरिसची साथ सोडली आहे. अलीकडेच फॉर्म्युला वनच्या एफआयए या संघटनेने संघांची प्रवेश यादी जाहीर केली, त्यात फेरारीचे नाव बदलले आहे. आता फेरारीला स्कुडेरिया फेरारी म्हणून ओळखले जाणार आहे.