आजचे राशी भविष्य, दि. ६ मार्च २०१९
   दिनांक :06-Mar-2019
 
मेष : आजचा दिवस फारसा लाभदायक नाही, त्यामुळे पैशांची स्थिती तपासा आणि आपल्या खर्चांवर मर्यादा घाला. नातेवाईक, मित्रमंडळी आणि व्यवसायातील सहकारी यांच्याशी कोणताही व्यवहार करताना तुमचे हित सांभाळा. कारण ते तुमच्या गरजा, निकड यांचा विचार करणार नाहीत.
 
वृषभ :  आपल्या माहितीतील लोकांमुळे उत्पन्नाचा नवा स्रोत सुरू होईल. तुमच्या नवीन योजना, प्रकल्प याविषयी तुमच्या पालकांना विश्वासात घेऊन सांगण्यासाठी काळ उत्तम आहे. आपल्या निखळ आणि उदार प्रेमाचे आपणास योग्य ते चीज होईल. मेहनत आणि सहनशीलता या आधारे तुम्ही उद्दिष्ट गाठू शकाल.
 
मिथुन : नवीन करार लाभदायक वाटण्याची शक्यता आहे, पण तुमच्या अपेक्षेप्रमाणे लाभ होण्याची शक्यता कमी आहे. पैसे गुंतवताना घाईगडबडीने कोणताही निर्णय घेऊ नका. दुस-यांना मदत करण्याची तुमची ताकद, सकारात्मक विचारांनी सुधारा. आपले संभाषणातील अनेक सुचना आपल्या कुटुंबियांना लाभदायक ठरतील.
 
कर्क : तुमच्या खेळकर-खोडकर स्वभावामुळे अवतीभवतीचे वातावरण प्रसन्न बनेल. तुम्ही काही दिवसांसाठी सुट्टीवर जात असाल तर काळजी करू नका. तुमच्या अनुपस्थितीत सारे काही सुरळित पार पडेल. तुमच्या चपळाईच्या कृतीने तुमचे प्रदीर्घ काळ प्रलंबित राहिलेले प्रश्न सुटतील.
 
सिंह :  सुखसमृद्धीने मानसिक लाड खूप होतात, मात्र वंचनेच्या काळात आपण कणखर बनतो. चांगली गुंतवणूक फक्त परतावा मिळवून देतील - त्यामुळे तुमच्या कष्टाचे पैसे गुंतवताना नीट विचार करा. कौटुंबिक जबाबदा-या या तुमच्या डोक्यावर येतील आणि तुमच्या मनावर दडपण येईल.

कन्या : झटपट पैसा कमावण्याची तुम्हाला इच्छा होईल. मुलांच्या बक्षिस समारंभाचे आमंत्रण हा तुमच्यासाठी आनंदाचा मार्ग ठरु शकतो. तुमची मुलं तुमच्या अपेक्षांवर पुरेपूर उतरल्याचे पाहून तुमची स्वप्ने सत्यात उतरल्याची प्रचिती मिळेल.
 
तूळ : कला व नाट्य क्षेत्रांशी संबंधित व्यक्तींना नवीन संधी मिळतील आणि त्यांना त्यांची कलात्मकता उत्कृष्टपणे दाखविता येईल. आज तुमच्याजवळील उत्तम संकल्पना आणि तुम्ही केलेल्या कृती यामुळे तुमच्या अपेक्षेच्या बाहेर तुम्हाला फायदा होईल.
 
धनु :  मेहनत आणि सहनशीलता या आधारे तुम्ही उद्दिष्ट गाठू शकाल. तुमच्या अवास्तव नियोजनामुळे निधीची कमतरता भासेल. आपल्या जोडीदाराच्या आरोग्याकडे दुर्लक्ष केल्याचा तुमच्या नातेसंबंधावर परिणाम होऊ शकतो. आपला किंमती वेळ त्यांच्या बरोबर घालवा.
 
मकर :  बंदिस्त किल्ल्याप्रमाणे स्वत:भोवती सुरक्षित चौकट आखून त्याचाच विचार करण्याची जीवनशैली तुमच्या शारीरिक तसेच मानसिक आरोग्यासाठी मारक आहे. तुम्हाला ही जीवनशैली चिंताग्रस्त आणि उदास बनवणारी असते. घराच्या दृष्टीने केलेली गुंतवणूक फायदेशीर ठरेल. दूरवर राहणा-या नातेवाईकांकडून अनपेक्षितपणे गोड बातमी मिळाल्याने संपूर्ण कुटुंबासाठी आनंदाचा दिवस ठरेल.
 
कुंभ : जुन्या केलेल्या चांगल्या कर्माचे फळ आज तुम्हाला मिळणार आहे. नवीन व्यावसायिक योजना आखाल. धार्मिक कार्यात वेळ घालवाल.  
 
मीन : काही दिववसांपासून असलेला तणाव आज कमी होईल. दिवस उत्साहात जाईल. आज अनपेक्षित पाहुणे घरी येण्याची शक्यता आहे.