दिल्लीतील पंडित दीनदयाल उपाध्याय अंत्योदय भवन इमारतीला भीषण
   दिनांक :06-Mar-2019
दिल्लीतील सीजीओ कॉम्प्लेक्समधील पंडित दीनदयाल उपाध्याय अंत्योदय भवन इमारतीला भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. बुधवारी (६ मार्च) इमारतीच्या ५ व्या मजल्यावर ही आग लागली आहे. या आगीत एका सीआयएसएफ निरीक्षकाचा मृत्यू झाला आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या २४ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझविण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.
 
 
मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी सकाळी आठच्या सुमारास ही भीषण आग लागली. आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही. या आगीमध्ये केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे(सीआयएसएफ) निरीक्षकांचा मृत्यू झाला आहे. या आगीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.