पाककडून F -१६ चा गैरवापर
   दिनांक :06-Mar-2019
नवी दिल्ली :
पाकिस्तानने भारतावर हवाई हल्ला करताना एफ १६ विमानांचा वापर केल्याचे पुरावे भारताने अमेरिकेला दिले असल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी मंगळवारी दिली. या प्रकरणाची चौकशी करून अमेरिका पाकिस्तानवर कारवाई करेल, अशी भारताला खात्री असल्याचेही या सूत्रांनी सांगितले. अमेरिका-पाकिस्तान करारानुसार या विमानांचा वापर फक्त दहशतवाद्यांविरुद्ध करणे बंधनकारक आहे.