नागरी वस्त्यांना लक्ष्य करु नका, भारतीय लष्कराचा पाकिस्तानला इशारा
   दिनांक :06-Mar-2019
भारतीय लष्कराने नागरी वस्त्यांना लक्ष्य करु नका असा इशारा दिल्यानंतरही पाकिस्तानकडून नियंत्रण रेषेवर काही निवडक भागात गोळीबार सुरु आहे. पाकिस्तानी सैन्याला नागरी वस्त्यांना लक्ष्य न करण्याचा इशारा दिल्यानंतर नियंत्रण रेषेवरील एकूणच परिस्थिती शांत आहे. पण मागच्या २४ तासात पाकिस्तानी सैन्याने कृष्णा घाटी आणि सुंदरबनी सेक्टरमध्ये गोळीबार करण्यासाठी मोठया शस्त्रास्त्रांचा वापर केला आहे.

 
भारतीय लष्कराने पाकिस्तानच्या या शस्त्रसंधी उल्लंघनाला त्याच तोडीचे उत्तर दिले आहे. भारताच्या बाजूला कुठलीही जिवीतहानी झालेली नाही असे भारतीय लष्कराकडून सांगण्यात आले. भारतीय लष्कर पूर्णपण प्रोफेशनल असून नियंत्रण रेषेवर नागरीक जिवीतहानी टाळण्यासाठी कटिबद्ध आहोत.
 
 
आपल्या संरक्षण दलांनी दहशतवादविरोधी आणि दहशतवादी इन्फ्रास्ट्रकचर मोडून काढण्यासाठी कारवाई केली आहे. नागरीक जिवीतहानी टाळण्यासाठी नागरी वस्त्यांपासून लांब ही कारवाई करण्यात आली असे भारतीय लष्कराकडून सांगण्यात आले.