पाकिस्तानकडून पुन्हा शस्त्रसंधीचे उल्लंघन; गोळीबार आणि तोफांचा मारा
   दिनांक :06-Mar-2019
नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून सातत्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन सुरु आहे. पाकिस्तानकडून १२ तासांच्या आत दुसऱ्यांदा राजौरी जिल्ह्यातील नौशेरा आणि सुंदरबनी सेक्टरमध्ये तुफान गोळीबार करण्यात आला. नौशेरा आणि सुंदरबनी सेक्टरमध्ये सकाळी १०.३०च्या सुमारास पाकिस्तानकडून दुसऱ्यांदा तुफान गोळीबार करण्यात आला. पाकिस्तानी सैन्याने तोफ गोळयांचा मारा केला.भारताकडून पाकिस्तानच्या या आगळीकीला चोख प्रत्युत्तर दिले जात आहे. सकाळी ४.३० च्या सुमारास जम्मू-काश्मीरमधील नियंत्रण रेषेवरील सुंदरबनी आणि पूंछ येथे पाकिस्तानी सैन्याने गोळीबार केला होता. 
 
 
 
सीमारेषेवर पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्याचे प्रमाण देखील वाढले आहे. मंगळवारी रात्री अकरा ते बुधवारी पहाटे साडे चार वाजेपर्यंत राजौरीतील सुंदरबनी सेक्टर येथे पाकिस्तानी सैन्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन केले.