महाराष्ट्रातील 6 महिलांना नारी शक्ती पुरस्कार
   दिनांक :07-Mar-2019
नवी दिल्ली,
विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणार्‍या महाराष्ट्रातील 6 महिलांना आज गुरुवारी नारी शक्ती पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. केंद्रीय महिला व बाल कल्याण मंत्रालयाच्यावतीने दरवर्षी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून विविध क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणार्‍या माहिलांना नारी शक्ती या प्रतिष्ठित पुरस्काराने गौरविण्यात येते. यावर्षी देशभरातील एकूण 44 महिलांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार असून, यात महाराष्ट्रातील सहा महिलांचा समावेश आहे. हा पुरस्कार प्रदान सोहळा राष्ट्रपती भवात होणार आहे. महाराष्ट्रातील महिलांमध्ये मुंबईतील सीमा राव, स्मृती मोरारका, कल्पना सरोज, सीमा मेहता, अहमदनगर जिल्ह्याच्या राहीबाई पोपरे, सातारा जिल्ह्याच्या चेतना गाला सिन्हा यांचा सन्मान होणार आहे.