चुरशीच्या लढतीत सायना विजयी
   दिनांक :07-Mar-2019
भारताची फुलराणी सायना नेहवाल हिने या स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत धडक मारली. सायनाने पहिल्या फेरीत स्कॉटलंडच्या कर्स्टी गिलमर हिचा २१-१७, २१-१८ अशा दोन सरळ गेममध्ये पराभव केला. दोनही गेममध्ये सायनाला गिलमरने कडवी झुंज दिली होती. पहिल्या गेममध्ये ४ गुणांच्या तर दुसऱ्या गेममध्ये ३ गुणांच्या फरकाने सायनाने गिलमरला पराभूत केले. दुसऱ्या फेरीत सायनाची झुंज डेन्मार्कच्या लाईन जाएर्सफेल्ड हिच्याशी होणार आहे.
 
 
 
याबाबत बोलताना सायना म्हणाली की कडवी झुंज देणाऱ्या खेळाडूंबरोबर खेळायला कायम मजा येते. ज्यावेळी प्रत्येकालाच विजेतेपद हवे असते, तेव्हा सारेच प्राण पणाला लावून खेळतात आणि स्पर्धा अधिक चुरशीची होती. अशा वेळी तुम्हाला तुमच्या नैसर्गिक खेळाकडे लक्ष देणे आवश्यक असते. पण स्वतःवर दडपण देण्यात काहीही अर्थ नसतो. कारण जे तुमच्या नशिबात आहे ते तुम्हाला मिळणारच.