मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अटल कामगार योजनेचा शुभारंभ
   दिनांक :07-Mar-2019
 
 समाजातील अंतिम व्यक्तीपर्यंत योजना पोहचविण्यासाठी सरकार प्रयत्नशील 
 
नागपूर :  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दुपारी नागपूर येथे अटल आहार योजनेचा शुभारंभ केला. ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महादेव जानकर, संभाजी पाटील निलंगेकर यावेळी उपस्थित होते. अटल आहार योजनेअंतर्गत प्रायोगिक तत्वावर काही भागात बांधकाम कामगारांना चांगल्या प्रतीचे आणि सकस भोजन अवघ्या ५ रुपयात दिले जाईल आणि नंतर योजनेचा विस्तार वाढविला जाईल.
 

 
 
 पहिल्या टप्प्यात २०,००० कामगारांचे लक्ष्य निर्धारित करण्यात आले आहे. पोलिस पाटील यांचे मानधन वाढविल्याबद्दल विदर्भ पोलिस पाटील संघटनेने यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सत्कार केला. या प्रसंगी बांधकाम कामगारांना विविध लाभांचे वाटप मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, मोठ्या संख्येने कामगारांची नोंदणी करताना आम्ही विविध कामगारांच्या कल्याणासाठी अनेक निर्णय घेतले आहेत. आता आमच्या कामगारांचे मुलं पीएचडी करत आहेत आणि यासाठी त्यांना सरकारकडून आर्थिक सहाय्य मिळत आहेत. आम्ही बांधकाम कामगारांना घरांसाठी ४.५ लाख रुपये देत आहोत. आरोग्य विमा योजनेचे लाभ त्यांना दिले जात आहेत. आज अटल आहार योजना सुरू केली. कामगारांना मासिक ३००० रुपये पेंशन योजनाही सुरू केली गेली आहे. आम्ही अशा अनेक योजनांसह समाजातील अंतिम व्यक्तीपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करीत आहोत.