रेल्वेचे 'अच्छे दिन' येणार; ५४ हजार कोटी रुपयांचे निधी मंजूर
   दिनांक :07-Mar-2019
केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने निवडणुकीआधीच्या शेवटच्या मंत्रिमंडळ बैठकीत देशाच्या आर्थिक राजधानीला मोठी भेट दिली आहे. मुंबईची लाईफलाईन मानल्या जाणाऱ्या रेल्वेसाठी ५४ हजार कोटी रुपयांचा निधी मंत्रिमंडळाने मंजूर केला आहे.
 
 
एमयूटीपी फेज ३ ए अंतर्गत येणाऱ्या रेल्वे मार्गांचा विस्तार आणि आधुनिकीकरण या कामांसाठी रेल्वे मंत्रालयाने ५४,७७७ कोटी रुपयांचा प्रस्ताव दिला होता. त्याला मंजुरी देण्यात आल्याचे केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. हा खर्च केंद्र आणि राज्य सरकार विभागून करणार आहे.