पंचवटी एक्स्प्रेसचे कपलिंग तुटले
   दिनांक :07-Mar-2019
ठाणे:
 
 मनमाड- मुंबई पंचवटी एक्स्प्रेसचे कपलिंग तुटल्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. मनमाड- मुंबई पंचवटी एक्स्प्रेस काही डबे मागे ठेऊन धावल्याची घटना समोर आली आहे. कल्याणच्या पत्रीपूल परिसराजवळ हे प्रकार घडले आहे. पंचवटी एक्स्प्रेस या गाडीचे इंजिनपासून दोन डबे पुढे धावले आणि अन्य डबे मागेच थांबले आहेत.
 
गुरुवारी सकाळी दहाच्या सुमारास ही घटना घडली. मनमाड- मुंबई पंचवटी एक्स्प्रेसचे काही डब्बे मागे राहील्याची बाब लक्षात येताच तातडीने एक्स्प्रेस थांबविण्यात आले. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. कपलिंग दुरुस्त करण्यात येत आहे. मध्य रेल्वेवर जलद मार्गावरील वाहतुकीचा खोळंबा झाला असून प्रवाशांचे प्रचंड हाल झाले आहेत. 
 
 
कल्याण, डोंबिवलीहून दररोज सकाळी हजारो प्रवासी सीएसटीएमच्या दिशेने प्रवास करतात. मात्र आज सीएसएमटीकडे जाणारी वाहतूक जवळपास १५ ते २० मिनिटे उशिराने सुरू झाली. यामुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला.