आता 20 लाखापर्यंतची ग्रॅच्युईटी करमुक्त - अरुण जेटली यांची माहिती
   दिनांक :07-Mar-2019
नवी दिल्ली,
यापुढे 20 लाख रुपयांपर्यंत मिळणार्‍या ग्रॅच्युईटीवर कोणताही कर आकारला जाणार नाही, अशी माहिती केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आज गुरुवारी टि्‌वटरवर दिली. या निर्णयामुळे 2018-19 मध्ये निवृत्त होणार्‍या नोकरदार वर्गाला मोठ्या प्रमाणात दिलासा मिळाला आहे. ग्रॅच्युईटी कायद्यांतर्गत न येणार्‍या नोकरदारांनाही हा निर्णय लागू होणार असल्याचे त्यांनी यात नमूद केले आहे. यंदाच्या अंतरिम केंद्रीय अर्थसंकल्पात आयकर संदर्भात काही महत्त्वपूर्ण निर्णय सरकारने घेतले आहेत. सरकारने 20 लाखांपर्यंतची ग्रॅच्युईटी करमुक्त असल्याचे जाहीर केले असले तरी, या निर्णयाची अंमलबजावणी कोणत्या तारखेपासून करण्यात येणार आहे, हे मात्र सांगण्यात आले नाही.