पेस्ट कंट्रोलिंगमुळे कॉलेज कॅन्टीन कामगारांचा मृत्यू !
   दिनांक :07-Mar-2019
कामगारांचा मृत्यू संशयास्पद असल्याची चर्चा 
 
 पुणे : कॉलेज कॅंटीनमध्ये केलेल्या पेस्ट कंट्रोलिंगमुळे दोन कँटीन कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्याच्या चर्चेने कात्रज परिसरात खळबळ उडाली आहे. हा मृत्यू नेमका पेस्ट कंट्रोलिंगमुळे झाला की, अन्य कारणाने हे अद्याप स्पस्ट होणे बाकी आहे. मृत पावलेल्या कर्मचाऱ्यांचे नाव अजय बेलदार आणि अनंता खेडेकर अशी आहेत. त्यापैकी अजय हा जळगावचा तर अनंता का बुलढाण्याच्या रहिवासी आहे.  
 


 
 
बुधवारी कँटीनचे काम संपवून ते त्यांच्या खोलीत झोपण्यासाठी गेले. सकाळी ते ठरलेल्या वेळेप्रमाणे पुन्हा कँटीनच्या कामाला गेले नाहीत. त्यामुळे कँटीनचा व्यवस्थापक त्यांना पाहण्यासाठी त्यांच्या खोलीकडे गेला. बराच वेळ दार वाजवूनही आतून काहीच प्रतिसाद न मिळाल्याने खोलीच्या मागील बाजूची खिडकी तोडून आत प्रवेश केल्यानंतर ते दोघेही बेशुद्धावस्थेत आढळले. त्यानंतर त्यांना उपचारासाठी भारती हॉस्पिटलला दाखल करण्यात आले. मात्र, त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
भारती विद्यापीठ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्या खोलीत दोन दिवसांपूर्वी पेस्ट कंट्रोल केले होते. त्यामुळे एक दिवस ते मित्रांकडे झोपण्यासाठी गेले होते. दुसऱ्या दिवशी, म्हणजे बुधवारी ते त्यांच्या खोलीतच झोपल होते. पेस्ट कंट्रोलिंगमुळे त्यांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे.