आजपासून दिव्यांगांना शिवशाहीमध्ये सवलत
   दिनांक :07-Mar-2019
पुणे : राज्य मार्ग परिवहन मंडळाने शिवशाही बसमध्ये दिव्यांग प्रवाश्यांना आजपासून सवलतीच्या दारात प्रवास उपलब्ध करून दिला आहे. दिव्यांग व्यक्तींना आणि त्यांच्या समवेत असलेल्या एका व्यक्तीस तिकीट दरात ७० टक्के सवलत लागू केली आहे. अपंगत्व असलेल्या प्रवाश्यांना  तिकीट दरामध्ये ७५ आणि त्यांच्या सोबत असणाऱ्या व्यक्तीस ५० टक्के सवलत देण्यात येते. तर, ६५ टक्के आणि त्या पेक्षा अधिक उपंगत्व असलेली व्यक्ती आणि त्याच्या सोबतच्या व्यक्तीस तिकीट दराच्या ५० टक्के सवलत देण्यात येते. सर्वसाधारण आणि निमआराम बस प्रवासासाठी ही सवलत लागू आहे. मात्र नव्याने सुरु झालेल्या शिवशाही बससाठी या सवलतील मुरड घालण्यात आली होती. 
 

 
 
 
त्यामुळे या बससाठी देखील प्रवास सवलत द्यावी अशी मागणी दिव्यांग संघटनांनी एसटी प्रशासनाकडे केली होती. त्या पार्श्वभूमीवर दिव्यांगांना शिवशाही बस प्रवासासाठी सवलत लागू करण्यात आली आहे.
दिव्यांग व्यक्तींना शिवशाही बस प्रवासासाठी प्रवास रक्कमेच्या ३० आणि त्यांच्या समवेत प्रवास करणाऱ्या एका व्यक्तीला ५५ टक्के रक्कम भरावी लागेल.