तरुणांना आलाय फेसबुकचा कंटाळा !
   दिनांक :08-Mar-2019
 अमेरिकेत १.५ कोटी अकाउंट बंद
 
ज्येष्ठ नागरिकांच्या संख्येत वाढ  
 
 अमेरिका : तरुणाईचा जीव की प्राण असलेली सोशल मीडिया वेबसाईट फेसबुकची लज्जत बहुदा कमी झाली आहे, कारण गेल्या २ वर्षात १.५ कोटी लोकांनी फेसबुक वापरणे सोडल्याचे समोर आले आहे.  मिळालेल्या माहितीनुसार हा अमेरिकेतला आकडा आहे. जगभरातला आकडा यापेक्षा बराच मोठा असून अद्याप याची आकडेवारी समोर येणे बाकी आहे. 
 

 
 
अमेरिकेतील मार्केट रिसर्च कंपनीच्या एडिशन रिसर्चच्या एका नव्या अहवालातून ही माहिती समोर आली आहे. या अहवाला फेसबुकवरील १२ ते ३४ वयोगटाच्या फेसबुक युजर्सनी फेसबुकला बाय-बाय केले आहे. विशेष म्हणजे फेसबुकवर जगभरात याच वयोगटातील लोक जास्त वापर करतात. एडिशनने आपल्या अहवालात म्हटले की, फेसबुकवर शेअर केलेल्या काही गोष्टी लीक झाल्याचे समोर आले होते. त्यामुळे अनेकांचा फेसबुकवरील विश्वास उडाला आहे. खासगी बाबी चव्हाट्यावर आल्याने अनेकांनी फेसबुक सोडणे पसंत केले आहे. फेसबुकवर तरुणांची संख्या खूप कमी होत असल्याचे या अहवालात म्हटले आहे. तर, ज्येष्ठ नागरिकांची संख्या वाढत असल्याचेही या अहवालात समोर आले आहे.