बुलढाण्यात दगडफेक; बस जाळली
   दिनांक :08-Mar-2019
बुलढाणा,
येथून दहा कि. मी. अंतरावर असलेल्या डोंगरखंडाळा या गावी आज सकाळी छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा प्रशासनाकडून हटविल्याच्या कारणामुळे गावात दगडफेक झाली. संतप्त गावकर्‍यांनी बुलढाणा पेठ मार्गे चिखली जाणारी बस क्रमांक एम.एच. ४० ८८५४ जाळली.
 
 
 
तसेच तहसिलदार सुरेश बगळे यांच्या वाहनावर वरवंड येथे झालेल्या दगडफेकीत त्यांच्यासह उपविभागीय अधिकारी सुहासिनी गोणोवार व तलाठी गणेश देशमुख तसेच चार पोलिस वाहनांवर दगडफेक झाली. अग्निशामक दलाच्या वाहनाची तोडफोड करण्यात आली. याप्रकरणी पोलिसांनी २२ जणांना अटक केली आहे.
 
 
 
जिल्हाधिकारी डॉ. निरूपमा डांगे, जि. पो. अधिक्षक डॉ. भुजबळ, निवासी जिल्हाधिकारी दुबे, मुकाअ षण्मुखराजन, खा. प्रतापराव जाधव, आ. हर्षवर्धन सपकाळ, आ. राहुल बोंद्रे, शिवसेनेचे संजय गायकवाड, जालीधर बुधवत, बुलढाणा अर्बनचे राधेश्याम चांडक यांनी घटनास्थळी भेट दिली. तसेच हा पुतळा सध्या ग्रामपंचायत कार्यालयाच्या जागेत ठेवण्यात आला आहे. त्या जागेवर सुशोभिकरण करून विधीवत हा पुतळा बसविण्याचे आश्वासन गावकर्‍यांना देण्यात आल्याची माहिती जिपो अधिक्षक डॉ. भुजबळ यांनी दिली आहे.