नेहा गद्रे अडकली विवाह बंधनात
   दिनांक :08-Mar-2019
मन उधाण वाऱ्याचे, अजूनही चांदरात आहे या मराठी मालिकांसह मोकळा श्वास या चित्रपटात आपल्या अभिनयाने चाहत्यांचे मन जिंकणारी मराठमोळी अभिनेत्री नेहा गद्रे अखेर विवाह बंधनात अडकली आहे.
 

 
 
 
 
नेहाने प्रियकर ईशान बापटसोबत विवाहगाठ बांधली. या विवाह सोहळ्याचे काही निवडक फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहे. या २ मार्चला पार पडलेल्या या विवाहसोहळ्यात कुटुंबीय, मित्रपरिवार आणि मजोरंजन क्षेत्रातला नेहाचा मित्रपरिवार उपस्थित होता. गेल्या वर्षी १० जुलैला आप्तेष्टांच्या उपस्थितीत त्यांचा साखरपुडा पार पडला होता. सोशल मीडियावर फोटो टाकल्यानंतर नेहावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.