९ दिवसांसाठी मुंबई-पुणे महामार्ग राहणार बंद !
   दिनांक :08-Mar-2019
 
 
मुंबई : १२ मार्च ते २० मार्च या ९ दिवसांमध्ये रोज १५ मिनिटांसाठी विशिष्ट लेनवरील वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. यावेळेत खंडाळा मार्गावरील ढिले झालेले दगड काढण्याचे काम करण्यात येईल.  पुणे प्रादेशिक विभागाच्या महामार्ग सुरक्षा पथकाने ही माहिती दिली. १५ मार्चला दुपारी सव्वा तीन पासून ते १८ मार्च दुपारी १२ वाजेदरम्यान वाहतूक सुरू ठेवण्यात येणार आहे. महामार्ग बंद ठेवण्यात येण्याची वेळ खालील प्रमाणे असेल.  
 
ब्लॉक १ - सकाळी १० ते १०:१५
ब्लॉक २- सकाळी ११ ते ११:१५
ब्लॉक ३- दुपारी १२ ते १२:१५
ब्लॉक ४- दुपारी २ ते २:१५
ब्लॉक ५- दुपारी ३ ते ३:१५