एअर स्ट्राईकची नाचक्की लपविण्यासाठी पाकिस्तानची धडपड
   दिनांक :08-Mar-2019
 पाकिस्तान : भारताने पाकिस्तानवर केलेल्या एअर स्ट्राईकमुळे पाकिस्तानचा दहशदवादाचा बुरखा पुन्हा एकदा फाटला, आणि याचे पुरावे जगासमोर येवू न देण्यासाठी आता तो धडपड करतो आहे. पाकव्याप्त काश्मीरमध्ये ज्या ठिकाणी भारताने हल्ला केला. त्या ठिकाणी पाकिस्तानने मीडियाला जाण्यास बंदी घातली आहे. न्यूज एजन्सी रॉयटर्सच्या एका टीमला गुरुवारी याचा अनुभव आला.. भारताकडून करण्यात आलेल्या कारवाईत भारतीय हवाई दलाने पाकव्याप्त काश्मीरमधील बालाकोटमधील 'जैश-ए-मोहम्मद' दहशतवादी संघटनेच्या तळांना लक्ष केले होते. याठिकाणी जाण्यास पाकिस्तानच्या अधिकाऱ्यांनी मीडिया टीमला जाण्यास विरोध केला. दहशदवादाला पोसण्याचे पुरावे जगासमोर येण्याच्या भीतीने ते लपविण्यासाठी पाकिस्तान धडपड करत आहे.