नक्षल्यांचा आदिवासी महिलांवर होणारा अत्याचार थांबविला जावा
   दिनांक :08-Mar-2019
- जागतिक महिला दिनी महिला विकास साखळीचे आयोजन
 

 
 
 
गडचिरोली,
नक्षल्यांचा आदिवासी महिलांवर होणार अत्याचार थांबविला जावा, नक्षल्यांकडून आदिवासी महिलांची होणारी हत्या थांबविण्यात यावी यासाठी आज जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून जिल्हा पोलिस प्रशासनाच्या वतीने बेबी मडावी आदिवासी महिला विकास साखळीचे आयोजन करण्यात आले होते.
 

 
 
येथील इंदिरा गांधी चौकात जिल्हाधिकारी शेखर सिंह , पोलिस अधीक्षक बलकवडे यांच्या उपस्थित कार्यक्रमाची सुरवात झाल्यानंतर त्यांनी वाहनातून विद्यार्थीनींच्या साखळीची पाहणी केली. ही साखळी पाच किलोमीटर पर्यत होती. यासाखळी कार्यक्रमात जिल्हाभरातील विविध शाळेतील विद्यार्थीनी सहभागी झाल्या होत्या. यावेळी नक्षल्यांच्या कृतीचा जाहीरपणे निषेध नोंदविण्यात आला.