सोनाक्षी सिन्हाच्या अटकेवर स्थगिती
   दिनांक :09-Mar-2019
अभिनेत्री सोनाक्षी सिन्हासह पाच जणांवर उत्तर प्रदेशच्या मुरादाबादमध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सोनाक्षीच्या अटकेवर अलाहाबाद न्यायालयाने स्थगिती आणण्यात आली आहे. ३७ लाखांची मोठी रक्कम घेऊन कार्यक्रमास अनुपस्थित राहिल्याप्रकरणी तिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.  न्यायाधीश नहीद अरा मुनीस आणि विरेंद्र कुमार श्रीवास्तव यांच्या खंडपीठाने ही स्थिगिती आणली असून पोलिसांना अधिक तपास करण्याचे आदेश दिले आहेत.

 
न्यायालयाने दिलेल्या स्थिगितीनंतर पोलिसांना या प्रकरणी अधिक तपास करावा लागणार असून सोनाक्षीलाही चौकशीदरम्यान पोलिसांना सहाय्य करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.