अट्टल मोटारसायकल चोर पोलिसांच्या जाळ्यात
   दिनांक :09-Mar-2019
मालेगाव : दोन महीन्यापुर्वी मालेगाव येथुन चोरीस गेलेल्या मोटारसायकल चोराला मालेगाव पोलीसांनी आज धामणगाव येथे अटक केली. मालेगाव येथील विकास वानखडे यांची बजाज प्लॅटीना मोटार सायकल क्रमांक एम एच ३७ डी ११५७ ही मंगळवार आठवडी बाजारातुन चोरीस गेली होती . याची तक्रार त्यांनी मालेगाव पोलीस स्टेशन मधे दिली होती . पोलिसांनी तपास यंत्रणा सक्रिय करीत गुन्हेगार धामणगाव रेल्वे येथे राहणाऱ्या २४ वर्षीय मंगेश सुरेश गायकवाड याला अमरावती पोलीसांनी अटक करून मोटारसायकल ताब्यात घेतली आहे. मालेगावचे पोलिस निरिक्षक आधारसिंग सोनोने यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ ज्ञानदेव भगत व ना. पो. कॉ. गजानन झगरे हे अमरावती येथे गेले .न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास मालेगाव पोलीस करीत आहेत .