सुरक्षा दलाच्या गोळीबारामुळे पाकिस्तानी ड्रोन फिरले माघारी
   दिनांक :09-Mar-2019
 राजस्थानच्या सीमेवरुन पाकिस्तानी ड्रोनने भारतीय हद्दीत घुसण्याचा प्रयत्न केला. हे पाकिस्तानी ड्रोन सीमा सुरक्षा दलाच्या जवानांच्या नजरेस पडताच त्यांनी ते पाडण्याचा प्रयत्न केला.
 
 
श्रीगंगानगर जवळ असलेल्या हिंदूमालकोट सीमेवरुन सकाळी पाचच्या सुमारास हे पाकिस्तानी ड्रोन भारतात घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत होते असे बीएसएफ अधिकाऱ्यांनी सांगितले. हे ड्रोन तैनात असलेल्या जवानांच्या नजरेस पडताच त्यांनी गोळीबार सुरु केला. त्यामुळे हे ड्रोन लगेच माघारी फिरले.
पश्चिम सीमेजवळ राहणाऱ्या गावकऱ्यांनी सुद्धा गोळीबाराचे मोठे आवाज ऐकले. गोळीबार सुरु होताच ड्रोन लगेच माघारी परतले असे बीएसएफच्या अधिकाऱ्याने सांगितले.