छत्रपतींचा इतिहास सामान्यांपर्यंत पोहोचवा
   दिनांक :09-Mar-2019
शरद मैंद यांचे आवाहन
 पुसद: छत्रपती शिवरायांचा खरा इतिहास सामान्य माणसांपर्यंत पोहोचवा असे आवाहन पुसद अर्बन बँकेचे अध्यक्ष तथा सहकार महर्षी शरद मैंद यांनी केले. छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार बालमनात रुजविणे गरजेचे आहे. शिव जन्मोत्सव समितीच्या वतीने भारती मैंद नागरी सहकारी पतसंस्थेच्या प्रयोजकतेतून आणि पुसद अर्बन बँकेचे अध्यक्ष शरद मैंद यांच्या मार्गदर्शनात आयोजित शिव सामान्य ज्ञान परीक्षेचा बक्षीस वितरण समारंभ ५ मार्च रोजी पुसद अर्बन बँकेच्या छत्रपती शिवाजी सभागृहात आ. डॉ. वजाहत मिर्झा यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला.
 

 
 
यावेळी उपवनसंरक्षक आयएफएस अरिंवद मुंढे यांच्या शुभ हस्ते व पुसद अर्बन बँकेचे अध्यक्ष शरद मैंद, चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष सूरज डूबेवार यांची प्रमुख उपस्थिती होती. ७ हजार विद्यार्थ्यांमधून इयत्ता ४ ते ७ या अ-गटातून प्रथम पूनम मनोज पतंगे, ५ वी कोषटवार दौलतखान विद्यालय पुसद, द्वितीय प्रतीक्षा सुधाकर राठोड इयत्ता ७ मातोश्री विद्यालय श्रीरामपूर, तृतीय जयदेव मोहन भालेराव इयत्ता ७ ज्योतिर्गमय इंग्लिश मेडियम स्कूल, पहिले प्रोत्साहनपर बक्षीस श्रीनाथ श्रीधरराव देशमुख इयत्ता ७ कोषटवार दौलतखान विद्यालय, तर दुसरे प्रोत्साहनपर बक्षीस चिन्मय संजय कदम इयत्ता ५ कोषटवार दौलतखान विद्यालय असे अनुक्रमनीत व प्रोत्साहनपर बक्षीस, तर इयत्ता ८ ते खुला गट असलेल्या ब गटातील प्रथम विजेते शुभम प्रतापराव सोळंके इयत्ता ८ कोषटवार दौलतखान विद्यालय, द्वितीय विजेत्या निर्जला विनोद मंदाडे इयत्ता ९ श्री शिवाजी विद्यालय, तृतीय विजेता शे. नय्युम शे. अब्दुल इयत्ता ९ लोकहीत विद्यालय, तसेच उत्कृष्ट गुण संपादन केलेले प्रोत्साहनपर देविका जीवन समुद्रे इयत्ता 8 कोषटवार दौलतखान विद्यालय, प्रोत्साहनपर वैभव धोंडू कावळे गुलाबनबी आझाद समाजकार्य महाविद्यालय पुसद हे १० विद्यार्थी रयतेच्या राजांच्या जीवन चरित्रावर आधारित परीक्षेत यशस्वी ठरले आहेत. दोन्ही गटातील यशस्वी विद्यार्थ्यांंना राशी, प्रशस्तिपत्र, साई प्रतिमा देऊन आयोजकांकडून सन्मानित करण्यात आले.