पाच वर्षात केले तीन सर्जिकल स्ट्राईक- राजनाथिंसह यांची माहिती
   दिनांक :09-Mar-2019
 
 
 
मंगळुरू,
उरी हल्ल्यानंतरची सर्जिकल स्ट्राईक आणि पुलवामा हल्ल्यानंतरची हवाई स्ट्राईक याशिवाय भारताने आणखी मोठी सीमापार कारवाई केली आहे, असे सांगताना केंद्रीय गृहमंत्री राजनाथिंसह यांनी, या तिसर्‍या कारवाईची माहिती देण्यास नकार दिला. मागील पाच वर्षांच्या काळात आमच्या सरकारने तीनवेळा सीमा ओलांडली आहे. या तिन्ही कारवाया प्रचंड यशस्वी राहिल्या आहेत. त्यातील गुलाम काश्मिरातील सर्जिकल स्ट्राईक आणि पाकिस्तानच्या बालाकोट येथील जैश-ए-मोहम्मदच्या अड्ड्यांवर करण्यात आलेल्या हवाई स्ट्राईकच माहिती तुम्हा सर्वांनाच आहे. मी देखील या दोनच कारवायांची माहिती तुम्हाला देऊ शकतो; मात्र तिसर्‍या कारवाईची माहिती देऊ शकत नाही. एक मात्र सांगतो, ही तिसरी स्ट्राईक देखील प्रचंड यशस्वी ठरली होती, असे राजनाथिंसह यांनी येथे आयोजित जाहीर सभेत बोलताना सांगितले. भारत आता कमजोर देश राहिलेला नाही. आपल्या शत्रूंना धडा कसा शिकवायचा, याचे तंत्र भारताला चांगले माहीत आहे. त्यामुळे भारताला कमजोर समजून हल्ला करण्याचे धाडस यापुढे कुणीही करू नये, असा इशाराही राजनाथिंसह यांनी दिला.