रेल्वेच्या युटीएस अ‍ॅपला प्रवाशांची पसंती
   दिनांक :09-Mar-2019
मोबाईलवरून तिकीट बुक करण्याच्या प्रमाणात वाढ 
 
पुणे : तिकीट खिडकीवर लांबच लांब रांगेत लागून प्रवाश्यांचे हाल होत असल्याने रेल्वे प्रशासनाने युटीएस हे मोबाईल अ‍ॅप विकसित या अ‍ॅपला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे रेल्वे प्रशासनाने सांगितले. मोबाईल अ‍ॅपद्वारे रेल्वे तिकीट बुकींग करण्यासाठी प्रवाशांची पसंती वाढू लागली आहे.
 

 
 
 
मागील वर्षभरात सुमारे पावणे चार लाख प्रवाशांनी युटीएस या अ‍ॅपद्वारे अनारक्षित तिकीट काढले. त्यामुळे तिकीट खिडकीवर होणारी प्रवाशांची रांग कमी झाली आहे. बऱ्याचदा वेळेवर तिकीट न मिळाल्यामुळे प्रवाश्यांची गाडी चुकायची. शिवाय अनावश्यक धावपळही व्हायची यावर तोडगा काढण्यासाठी  रेल्वे प्रशासनाने युटीएस अ‍ॅपची निर्मिती केली आहे. या अ‍ॅपद्वारे कुठेही जाण्यासाठी अनारक्षित तिकीट काढता येते. दि. ४ एप्रिल २०१८ पासून पुणे विभागातील उपनगरीय स्थानकांसाठी ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. त्यानंतर दि. १२ ऑक्टोबर रोजी सर्व स्थानकांसाठी ही सुविधा खुली केली. रेल्वे स्थानक इमारत किंवा रेल्वेमागार्पासून दोन किलोमीटर अंतराच्या आत मोबाईलवर अ‍ॅपद्वारे तिकीट काढता येते. पुणे विभागात दि. ६ मार्च पर्यंत ३ लाख ७५ हजार ५८६ प्रवाशांना या सेवेचा वापर केला आहे.त्यामुळे हे अ‍ॅप प्रवाशांच्या  पसंतीस उतरले आहे.