आजचे राशी भविष्य, दि. ०१ एप्रिल २०१९
   दिनांक :01-Apr-2019
मेष :  स्वतचे कार्यविश्व विस्तारण्यासाठी केलेले प्रयत्न यशस्वी ठरतील. सार्वजनिक जीवनात महत्त्वाचे पद वा मानसन्मान असे मिळेल. आर्थिक प्रगतीच्या अनेक वाटा समोर येतील. बँक बॅलन्स वाढता राहील.
 
वृषभ : आर्थिकबाबतीत येणारे अंदाज अचूक ठरतील. शेअर मार्केटमध्ये काम करणाऱ्यांना आपल्या अभ्यासाचा चांगला फायदा होईल. कामाचे गणित व्यवस्थित जमवता येईल. व्यापारीवर्गाला मनातून लागलेली आगामी काळाच्या विस्ताराची चाहूल प्रत्यक्षात येताना दिसेल.  
 
मिथुन :   नोकरी-व्यवसायात स्वार्थासाठी गोड बोलणाऱ्यांची संख्या मोठी असणार आहे. त्यातले नेमके आपले कोण याचा शोध घेत गेल्यास आपल्या कामामध्ये त्यांचा उपयोग होऊ शकेल. व्यापारीवर्गाला नवीन आलेले नियम आणि नव्याशी नेतृत्वाशी झालेला संपर्क यातून व्यापार वाढीसाठी सकारात्मक प्रयत्न करता येतील.
 
कर्क :  कामापुढे प्रेम प्रकरणे किंवा अन्य भावनिक प्रश्न मोठे ठरू देऊ नका. वैवाहिक जोडीदाराची मिळणारी साथ आणि कुटुंबातील काही सुटत जाणारे प्रश्न यातून उत्साह वाढता राहील.
 
सिंह : अनेकांची मिळणारी साथ, सरकारी नियमांमध्ये येत असलेली अनुकूलता, सार्वजनिक जीवनातून मिळणारा
चांगला प्रतिसाद आणि राजकीय नेतृत्वाशी होत असलेली सलगी यातून आपल्या प्रगतीच्या वाटेवर यशाची शिखरे येत राहतील.
 
कन्या : आपण ठरवू त्याप्रमाणे कामे होतील अशी अपेक्षा करू नका. कोणताही केलेला अतिरेक अंगाशी येऊ शकतो. विरोधकांशी केलेले दोन हात फिरून पुन्हा त्रासदायक ठरू शकतात. 
 
तूळ : कुटुंबात होत असलेले काही शुभ प्रसंग, स्थावराच्या दृष्टीने येत असलेले काही अनुकूल निर्णय, वैवाहिक जीवनात होत असलेली दिलजमाई आणि नातेवाईकांचे दूर होत असलेले गरसमज यातून चांगली शांतता आणि समाधान मिळवू शकाल.
 
वृश्चिक : नोकरदारांना कामाच्या दर्जामध्ये केलेली वाढ बरेच काही देणारे ठरेल. प्रेम प्रकरणांना अनुकूल रंग भरले जातील. विवाह इच्छुकांसाठी गोड बातम्या येतील.
 
धनु : वाढते मनोबल व आत्मविश्वास अनेक क्षेत्रांत उपयोगाला येईल. प्रसिद्धीचे अनोखे तंत्र हाती येईल.
 
मकर :  मोठी जोखीम घेणे हिताचे ठरणार नाही. नोकरदार यांनीही आपापली कामे कायदेशीर चौकटीत ठेवणे हिताचे ठरेल. वैवाहिक जोडीदाराचे अंदाज आणि सल्ला यांचा उपयोग अवश्य करून घ्या.
 
कुंभ : नव्याने घेतलेले निर्णय अचूक ठरतील. घरांमधून मिळणारा पािठबा उपयुक्त ठरेल. सरकारी नियमभंग होऊ देऊ नका. भाऊबंदकीच्या वादात जास्त अडकू नका.
 
मीन : विवाहेच्छूंना अपेक्षित प्रस्ताव मिळतील. बेकारांची धावपळ थांबेल. संततीच्या अपेक्षित असणाऱ्यांना गोड चाहूल लागेल. प्रेम प्रकरणांना योग्य दिशा मिळेल.